शिक्षकांसाठी मोठी बातमी: वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी उद्यापासून सुरू; ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी

शिक्षकांसाठी मोठी बातमी: वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी उद्यापासून सुरू; ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी

पुणे: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी महत्त्वाचे असलेले ‘वरिष्ट व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६’ साठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) मार्फत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, उद्या २० एप्रिल २०२६ पासून नोंदणी पोर्टल खुले होणार आहे.

काय आहेत महत्त्वाचे नियम आणि अटी?

  • पात्रता: वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत १२ वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. तर, निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी २४ वर्षे सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
  • सेवानिवृत्त शिक्षकांसाठी सूट: जे शिक्षक १ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत निवृत्त होत आहेत आणि त्यांची १२ किंवा २४ वर्षे सेवा पूर्ण होत आहे, त्यांना केवळ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
  • नोंदणीचा कालावधी: नोंदणी २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील. यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • नोंदणी कोठे करावी? परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mhttp://नोंदणी कोठे करावी? परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maa.ac.in ‘प्रशिक्षणे’ या टॅबमधील ‘वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण’ या लिंकवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.aa.ac.in ‘प्रशिक्षणे’ या टॅबमधील ‘वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण’ या लिंकवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

प्रशिक्षणाचे स्वरूप

हे प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने होणार असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मार्फत एकाच कालावधीत घेतले जाणार आहे. प्रशिक्षणाचे माध्यम मराठी असेल, मात्र वाचन साहित्य इंग्रजी आणि उर्दू भाषेतही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कोणाला नोंदणी करता येणार नाही?

विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येणार नाही. तसेच, तांत्रिक कारणांमुळे आदिवासी विकास विभाग (नाशिक), समाजकल्याण आयुक्तालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि काही महानगरपालिका (मुंबई, नागपूर) यांना सध्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

येथे संपर्क साधा

शिक्षकांना नोंदणीत काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

  • अभिनव भोसले (विषय सहाय्यक): Mobile No see the Letter for mobile no
  • तांत्रिक सहाय्य (Trifnd Pvt. Ltd.): ९५११८७४३७३(संपर्क वेळ: कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५)

“वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन राज्य स्तरावरून करण्यात आले असून, पात्र शिक्षकांनी विहित मुदतीत आपली नोंदणी पूर्ण करावी,” असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी केले आहे.


Scroll to Top