विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांचे प्रेरणादायी निरोप पत्र | Send Off Letter in Marathi

जिल्हा परिषद ढोले वस्ती रांझणी शाळेमध्ये चौथी पास डिग्री प्रदान सोहळा संपन्न..

ढोले वस्ती-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोले वस्ती या शाळेमध्ये चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी चळे केंद्रातील केंद्रप्रमुख माननीय श्री प्रभाकर उत्तम घाडगे साहेब प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच आदरणीय,उपक्रम शिक्षिका , मार्गदर्शक, श्रीमती सुचिता अंकुशराव मॅडम, सुमन विजागत ,सार्थक बळवंत प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.तसेच मीनाक्षी पाटील मॅडम.पाटील सर,सौ.लक्ष्मी गोसावी,सौ.पुजा ढोले, सौ. लतिका सुरवसे, शिक्षण तज्ञ म्हमाणे काका, नागनाथ म्हमाणे हे उपस्थित होते.

यामध्ये सर्व मुलांना जेवण दिले हे किसन गोसावी व मा. बापु ढोले यांनी अन्नदान केले. अनमोल संस्कारांची शिदोरी म्हणून संदेशपत्र देण्यात आले.मा केंद्रप्रमुख प्रभाकर घाडगे साहेब यांचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सुखदेव विजागत व सहशिक्षिका मा उज्ज्वला चनाळे मॅडम यांनी नियोजन केले..

तसेच मा सौ.पुजा बापु ढोले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
मा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय बापू ढोले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.व आभार मानले.

शाळेतील ४ थी पास मुलांना दिलेला अनमोल संदेश

प्रिय विद्यार्थ्यांनो, सस्नेह आशीर्वाद!
आज तुमचा शाळेतील निरोपाचा म्हणजेच सेंडऑफचा दिवस. आज तुम्हाला निरोप देताना मन थोडं भावूक झालं आहे, पण तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात पाहताना तितकाच आनंद आणि अभिमानही वाटत आहे. आज या महत्त्वाच्या दिवशी, एक मुख्याध्यापक म्हणून मला तुम्हाला आयुष्याची शिदोरी म्हणून काही गोष्टी सांगायच्या आहेत.
बाळा, आयुष्यात खूप मोठा हो, भरपूर शिक्षण घेऊन ज्ञानवंत हो. पुढचा प्रवास नेहमीच सोपा नसेल, त्यात अनेक वळणे येतील. एखाद्या वेळी अपयश आलं, खेळात किंवा आयुष्यात कधी हारलास तर अजिबात नाऊमेद होऊ नकोस. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि जेव्हा कधी भरभरून यश मिळेल, जिंकलास तर त्याचा कधीही उन्माद करू नकोस. तुझे पाय नेहमी जमिनीवर असू देत आणि नम्रता अंगी बाळग.
ज्ञानाची भूक कधीही संपू देऊ नकोस, नेहमी आवडीने अभ्यास कर. कोणत्याही कामात चिकाटी धर, ती तुला नक्कीच तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. नेहमी अनुभवी आणि मोठ्या माणसांचे ऐक, त्यांच्या शब्दांतून मिळणारे शहाणपण आणि मार्गदर्शन तुला खूप पुढे नेईल. आयुष्यात कितीही धावपळ असली तरी, प्रत्येक दिवस मनमुराद आणि आनंदाने जग.
या जगात कोणीही जन्मजात मोठा नसतो आणि कोणीही छोटा नसतो, याचे कायम भान ठेव. माणसाची ओळख त्याच्या पैशाने किंवा पदाने नाही, तर त्याच्या कर्माने आणि स्वभावाने होते. सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वाग.
शेवटी मला तुला एवढंच सांगायचं आहे की, तू खूप छान आहेस! तुझ्यामध्ये अफाट क्षमता दडलेली आहे. स्वतःवर नेहमी विश्वास ठेव आणि कधीही स्वतःला कमी लेखू नकोस.
तुझ्या भावी आयुष्यातील प्रत्येक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून आणि आपल्या संपूर्ण शाळेकडून तुला खूप खूप शुभेच्छा! यशस्वी भव!
तुझाच गुरुजी
ज्ञानेश्वर विजागत
जि.प.प्रा.शाळा ढोलेवस्ती रांझणी, शाळेतील ४ थीपास मुलांना दिलेला अनमोल संदेश…………

Scroll to Top