4th Class Pass Padavi Pradan Sohala

ढोलेवस्ती शाळेत पदवीप्रदान समारंभांचे आयोजन करुन ४ च्या मुलांना निरोप*

आज ढोलेवस्ती शाळेत ४ च्या मुलांचा निरोप समांरभ साजरा करण्यात आला कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे मा.श्री मारुती काळूंगे साहेब केंद्रप्रमुख चळे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बापु ढोले,उपाध्यक्ष श्री समाधान गवळी,शिक्षणतज्ञ श्री.रावसाहेब म्हमाणे,श्री.किसन गोसावी,लक्ष्मी गोसावी,श्री अनिल सुरवसे हे उपस्थित श्रीम.सुमन विजागत हे उपस्थित होते.

यावेळी मुलांना आपले मनोगत व्यक्त केले.तसेच मा मुख्याध्यापिका श्रीम संध्या काळे यांनी आपले विचार मांडले व सहशिक्षक विजागत ज्ञानेश्वर यांनी मुलांच्या प्रगती बददल सर्वााना माहिती सांगितली.

*कार्यक्रमाचे वैशिष्टे*

१) पदवीदान समारंभासारखे प्रत्येक मुलांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

२) प्रत्येक मुलांनी आपले विचार व्यक्त केले. शिवराज सुरेश गांडुळे हा मुलगा प्रथम आपले मनोगत व्यक्त केले.

३) सर्व मुलांना स्वीट जिलेबी आणि समोसा व खाऊ वाटप करण्यात आले.

३) सेल्फी स्टँड सोबत सर्वांनी फोटो काढले.

४) मुलांना प्रथमच पदवी ड्रेस परिधान करुन ४ थी पास निरोप देण्यात आला.

५) यावेळी मान्यवरांचे सत्कार मुलांच्याहस्ते करण्यात आले.

आज आपल्याकडे अनेक प्रकारच्या डिगऱ्या आहेत परंतू अशा प्रकारचे कार्यक्रमात आपण सहभागी होत नाही आणि परंतू मुलांना मोठे व्हावे आणि स्वता डिगऱ्या प्राप्त कराव्यात आणि समाजसेवा करावी तसेच स्वता ज्ञानवंत व्हावे असा संदेश आम्हाला दयायचा होता.

या उपक्रमाचे अशा प्रकारे नाविण्यपूर्ण आयोजन केल्याबददल मा गटशिक्षणाधिकारी मा मारुती लिगाडे आणि केंद्रप्रमुख मा. मारुती कांळुगे यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे व पालक यांनी आपल्या मुलांसाठी शिक्षकांनी अशा प्रकारचा कार्यक्रम राबविला त्याबददल त्यांनी समाधान व्यक्त करुन शिक्षकांचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन म

मा विजागत ज्ञानेश्वर यांनी केले.१ ली प्रवेश अभियानाला सुरुवात केली आहे. सर्वांनी १ ली प्रवेश घेण्यासाठी फक्त आधार कार्ड घेवून शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी यावे यासाठी आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद म्हणून १ लीचे ६ जणांचे प्रवेश घेण्यात आले असून शाळेत सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरु आहे.१ ली प्रवेशासाठी शाळेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply