जिल्हास्तरीय समूह लोकनृत्य स्पर्धेत बार्शीचा दबदबा

समूह लोकनृत्य स्पर्धा —-2024-25

सोलापूर जिल्हा परिषदने राबवलेला अत्यंत महत्वाकांशी उपक्रम म्हणजे विदयार्थ्याी गुणवत्ता शोध स्पर्धा या स्पर्धा सध्या अंतिम टप्यात आल्या आहेत. दर वर्षी या स्पर्धा विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम राबविला जातो.या उपक्रमात विविध प्रकारचे खेळ जसे कबडडी,खो-,लंगडी,बुध्दीबळ,सामूहिक गायन,सामूहिक नृत्य अशा प्रकारचे खेळ ,स्पर्धा घेत आहेत. याला जिल्हयातील सर्व जिपच्या शाळेतील मुलांना याचा फायदा होत आहे.समूह लोकनृत्य स्पर्धा —-2024-25सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल येथे आयोजन केले होते.

सहभागी संघ चित्र

मागील वर्षा पासून या सर्व स्पर्धा सोलपूर या ठिकाणी होत होत्या त्या आता प्रत्येक तालुकयाला नियोजन देवून त्याच तालुक्याच्या मार्फत केल्या जातात. काल झालेल्या सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रत्येक तालुकयातून प्रथम क्रमांकाच्या शाळेने सहभाग घेतला होता. या मध्ये सर्व ११ तालुक्याने सहभाग घेतला होता. यामध्ये दोन गट करण्यात आले होते. १) लहानगट – १ ली ते ५ वी व २) मोठा गट- ६ वी ते ८ वी असे दोन गट होते.
सामूहिक नृत्य स्पर्धा हया मा.शिक्षणाणिकारी कादर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती बार्शी आयोजित कोणत्या ही तक्रारी विना अत्यंत जोश पुर्ण आणि अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल च्या प्रांगणात हिरवळीच्या सुंदर अशा वातावरणात शांततेत पार पडल्या.

या मध्ये लहान गटात तिसरा क्रमांक जि.प.शाळा आष्टि तालुाका मोहोळ, व्दितीय-कुसळंब बार्शी तालुका बार्शी तर प्रथम क्रमांक श्रीदेवीचा मळा तालुका करमाळा याने पटकावला.

मोठा गटात तिसरा क्रमांक -तांबडाग मोहोळ खंडोबा गीत तालुका मोहोळ, व्दितीय-अंत्रोळी द. सोलापूर तर प्रथम क्रमांक खांडवी तालुका बार्शी याने पटकावला.


यासाठी बार्शी गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके- ग शि अ बार्शी मुख्याध्यापक मा.प्रशांत कोल्हे सर ,धनाजी जाधवर,केंद्रप्रमुख,डॉ विलास काळे केंद्रप्रमुख,विठ्ठल गवळी- व पंचायत समिती बार्शी येाथील सर्व विषयसाधन व्यक्ती यांचे नियोजनाखाली पार पडला.अशी माहिती मिळाली आहे.

Scroll to Top