ईबाममी नेटवर्क-आज पंचायत समिती पंढरपूर तालुकास्तरीय गुणवत्ता शोध सामूहिक नृत्यस्पर्धा पार पडल्या.यामध्ये सर्व केंद्रानी सहभाग नोंदवला होता या मध्ये एकुण २२ केंद्रांचे प्रत्येकी १ असे संघ १ ते ५ व ६ ते ८ असे संघ सहभागी झाले होते.प्रत्येक केंद्रातील१ शाळेने उत्कृष्ट सादरीकरण केले. अशा शाळा वेगवेगळे विषय घेवून सहभाग नोंदवला होता.यावर्षीच्या स्पर्धा हया रांझणी येथील भव्य मंडपामध्ये आयोजन केले होते.चळे केंद्रातील केंद्रप्रमुख मा कांळुगे साहेब व ओझेवाडी केंद्रातील केंद्रप्रमुख श्री.बंडगर साहेब यांनी काटेकोर नियोजन केले होते या मध्ये जि प प्रा शाळा रांझणी व केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक शाळेने भन्नाट असे सादरीकरण केले त्यात लहान गटात जिपप्राशाळा मुंढेवाडी तर मोठयात गटात जिपप्राशाळा रांझणी शाळेने प्रथम क्रमांक पटकवला.व्दितीय क्रमांक लहान गट-भाळवणी तर मोठया गटात जळोली शाळेने क्रमांक पटकवला.तृतीय क्रमांक क्रमांक जिपप्राशाळा शिरढोण शाळा व मोठया गटात जिप प्रा शाळा शेवते शाळेने मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवलेल्या लहान गटात मुंढेवाडी शाळेने आदीवासी हे नृत्य सामूहिक गटात सादरीकरण केले आहेतसेच मोठया गटात रांझणी शाळेने हरियाण ग्रामिण हे नृत्य उत्कृष्ट पणे सादरीकरण केले.यावेळी गटशिक्षणाणिकारी श्री मारुती लिगाडे,श्री.रामभाऊ यादव गुरुजी,श्री प्रशात वाघरमारे,SMC अध्यक्ष श्री. सिताराम दांडगे व गावचे सरपंच श्री श्रीमंत दांडगे हे उपस्थित होते.या कामी परीक्षक म्हणून श्री.सचिन भागवत निकम,किरण परमेश्वर देठे,थिटे एस ए, चंदनशिवे सर,श्रेया बजाज या तज्ञांनी उत्कृष्टपणे गुणदान केले. त्यावेळी सर्व परीक्षकांचे स्वागत करण्यात आले.सांऊड व इतर नियोजन श्री विलास दांडगे,देवा अनपट,विजागत ज्ञानेश्वर व मुख्याध्यापक रांझणी श्री सुभाष यलामर,श्री राजेंद्र इुबल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अंकुश नामदे,बापु लहाने,माऊली दुधाणे,मा. मारुती क्षिरसागरव सुत्रसंचालक श्री ज्ञानेश्वर मोरे रांझणी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रांझणी संपूर्ण स्टाप,ओझेवाडी केंद्र सर्व मुख्याध्यापक,चळे केंद्रातील मुख्याध्यापक व रांझणी ग्रामस्थ उपस्थित होते. Post navigation शाळेत परसबाग उपक्रम SCHOOL GARDEN Central Teacher Eligibility Test CTET N ew Notification