शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी(TAIT)-2025 All Information

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSCE) द्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ (Teacher Aptitude and Intelligence Test 2025) चे आयोजन करण्यात येत आहे. 1 ही परीक्षा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी घेतली जाईल. 2 यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 2

महत्वाच्या तारखा आणि तपशील:

  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक: bellow
  • ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी: २६/०४/२०२५ ते १०/०५/२०२५  
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १०/०५/२०२५, रात्री ११:५९ पर्यंत  
  • प्रवेशपत्र ऑनलाईन मिळवण्याचा कालावधी: परीक्षेच्या ७ दिवस आधीपासून  
  • ऑनलाईन परीक्षा दिनांक: २४/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ (उमेदवारांच्या संख्येनुसार बदल संभवतो)  

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाइट www.mscepune.in ला भेट द्यावी.

Website: www.mscepune.in

दिनांक : २५/०४/२०२५ महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

  “अ.क्र.”, “तपशील”, “विहित कालावधी” “१”, “ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक”, “https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/” “२”, “ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी”, “२६/०४/२०२५ ते १०/०५/२०२५” “३”, “ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक”, “१०/०५/२०२५ रोजी २३:५९ वाजे पर्यंत” “४”, “प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी”, “परीक्षेच्या ७ दिवस आधीपासून” “५”, “ऑनलाईन परीक्षा दिनांक”, “२४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ (प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.” 1 सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in ‘या संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ व २०१९ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती करणेबाबतची यादी’ या सदरात (Tab) वर प्रसिद्ध केलेली आहे. 2 प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही ? याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी, आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच २०१८ व २०१९ च्या गैरप्रकाराच्या यादी मध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

  उपलब्ध पदसंख्या : राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व व बिंदुनामावली नुसार ‘पवित्र’ (PAVITRA-Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.

  ३. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः

३.१ परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. 3 भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) या वरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. 4 त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी – उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. 5 प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र.१०६/टीएनटी-१, दि. १०/११/२०२२ मधील मुद्दा क्र. ३.३ अन्वये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ करिता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील.

३.२ अभ्यासक्रमः

अ) सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. 6 परिक्षेसाठी निवडलेल्या पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.

The following table:

अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्त्व इत्यादी उपघटक राहतील. 8 बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. 9 सदर परीक्षाही विषयज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तरमर्यादा असणार नाही. 10 परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा (१२० मिनिटे) कालावधी राहील.

४. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :

४.१ नियुक्त करावयाच्या रिक्त पदांचा सामाजिक समांतर आरक्षण, अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांबाबतचा तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी व्यवस्थापन यांच्या ‘पवित्र प्रणाली’वरील जाहिरातीनुसार राहील.

  ४.२ विविध मागास प्रवर्ग, महिला, माजीसैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठीचे सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.

  ४.३ दिव्यांग अधिनियम २०१६ नुसार शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी ४ टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. 11 याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२१/प्र.क्र.१२०/टिएनटी- १. दि. २०/१०/२०२२ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय तसेच महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील तरतुदी लागू राहतील.

  ४.४ महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे.

  ४.५ ऑनलाईन अर्ज करताना एखादी जात/जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केले असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांकडे उपलब्ध असेल तर संबंधित जातीचे/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

  ४.६ समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६ अ, दि. २३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुद्धिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकिर्ण- १११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधो ४०२४/प्र.क्र. १४/१६-अ दि. २५ जानेवारी, २०२४ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

  ४.७ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले (केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले) प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. 12 केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (केंद्रीय सेवांसाठी लागू असलेले) शिक्षक पदभरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

  ४.८ सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता (एसईबीसी) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दि. २७/०२/२०२४ नुसार कार्यवाही करण्यात यावी.

  ४.९ आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील/सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्रधिकाऱ्याने वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 ४.१० आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. 13 सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.

४.११ आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयीसवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.

  ४.१२ खेळाडूसाठीचे आरक्षण: शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र.६७/क्रियुसे-२, दिनांक १ जुलै २०१६ तसचे शासन शुद्धिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक : राक्रीधो-२००२/प्र.क्र.६७/क्रियुसे-२, दि. १८ ऑगस्ट २०१६, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक : संकिर्ण- १७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसो-२, दि. ३० जून २०२२ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार ‘प्रावीण्यप्राप्त खेळाडू’ आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादा सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. 14 ‘प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.

  ४.१३ दिव्यांग आरक्षणः दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ. दि. २९ मे २०१९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. 15 दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. अप्रकि- २०१८/प्र.क्र. ४६/आरोग्य-६, दि. १४ सप्टेंबर २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व UDID कार्ड नंबर सादर करणे अनिवार्य आहे. 16 सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रवि२०१७/प्र.क्र.१९६/आरोग्य-६, दि. १३/१०/२०१७ अन्वये दिव्यांग उमेदवारांसंबंधी मार्गदर्शक सूचनेनुसार विहित नमुन्यातील प्रपत्रे परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक किंवा परीक्षा निरीक्षक यांचेकडे देण्यात यावी. 17 दिव्यांग उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन पत्र दिनांक १३/१०/२०१७ मधील तरतुदीनुसार लेखनिक घेणेसाठी त्यांनी ज्या जिल्ह्यातून परीक्षेस प्रविष्ठ झाले त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडून पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. 18 लेखनिक हा इ. १२ वी अथवा १२ वी पेक्षा कमी शिक्षण झालेला असावा.

  ४.१४ अनाथ आरक्षणः अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र.: अनाथ – २०१८/प्र.क्र. १८२/का-०३, दि. २३ ऑगस्ट २०२१, शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्र. दअनाथ – २०२२/प्र.क्र. १२२/का-०३, दि. ६ एप्रिल २०२३, शासन पूरक पत्र क्र. अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का- ०३, दि. १० मे २०२३ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. 19 अनाथांच्या आरक्षणाच्या लाभ घेण्याकरिता उमेदवार महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. 20 महिला व बालविकास विभागाकडून ज्या अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत, अशी बालके आरक्षणासाठी पात्र राहतील., तथापि, ज्या बालकांच्या आई-वडिलांचे निधन त्या बालकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल अशाच अनाथ उमेदवारांना अनाथ आरक्षण अनुज्ञेय राहील.

४.१५ माजी सैनिक आरक्षणः शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र.१५३ /टीएनटी-१, दि. ३० जून २०२२ अन्वये उमेदवार राज्यातील माजी सैनिक (स्वतः), शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय असल्यास त्यांनी त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. 21 माजी सैनिकांकरिता आरक्षणा संदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहतील.

  ४.१६ प्रकल्पग्रस्त आरक्षणः शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. एईएम-१०८०/३५/१६-अ, दि. २०/०१/१९८० तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण राहील.

  ४.१७ भूकंपग्रस्त आरक्षणः शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. भूकंप-१००९/प्र.क्र.२०७/२००९/१६-अ, दि. २७/०८/२००९ तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार भूकंपग्रस्ताचे आरक्षण राहील.

वरील प्रमाणे पत्र MSCE ने आपणा सर्वाासाठी दिलेले आहे
टिप- टाईप करताना काहीवेळेस चुक होवू शकते अधिकृत साईटचे ही नियम व अटी पाहाव्यात.

Scroll to Top