श्री बळवंतराव यादव हायस्कुल पेठवडगाव येथे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी चा मेळावा संपन्न्

पेठवडगाव – ईबातमी- श्री बळवंतराव यादव हायस्कुल पेठवडगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी मिळून संयुक्त १० वी तुकडी ''ब'' आणी १० वी "क" यांचा स्नेहमेळावा अतिशय उत्साहात व मोठ्या संख्येमध्ये संपन्न झाला.

या स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी महा स्नेह मेळावा संपन्न् झाला. या मेळाव्यात अनेक प्रकारचे खेळ,गप्पा,गाणी,डान्स, आणि आठवणीची बालमनाचे मन ताजेतवाने होणारं प्रसंगांची आठवणीची रेलचेल भरास आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे श्री.संताजी भोसले सर,श्री भोरे सर,श्री ङिबी जाधव सर, एच एम मेथे सर,डि के पाटील सर आणि घोरपडे मामा. हे होते.      आजच्या डिजीटल युगात अनेक मित्र आपण ऑनलाईन जोडतो. त्यांना मनमोकळे पणाने गप्पा मारतो, आपल्या मनाचे दरवाजे अलगद पणे मोकळे करत असतो अशा अभासी युगात आपणास हजारो ऑनलाईन मित्र असले तरी आपले सखे सोबती संवगंडी हे बालपणाचे मित्र,दोस्त असतात. कारण आपलं प्रत्यक्ष आयुष्य सोबत जगलेलो असतो. त्यामुळे अशा मित्राना आपण भेटलो की आज ही आपण लहान असल्यासारखे वाटते, या जगात आपण कधीच एकटो नव्हतो आणि नाही असा भास होण्यास मदत होते आपला एकटेपणा कमी होतेा आपण पुन्हा आपल्या बालपणात रमून जातो.
students with
SSC BATCH 2004
      असाच मेळावा पेठवडगाव येथे भरला होता. कोणता ही कार्यक्रम म्हणजे नियोजन आलेच.हे नियोजन करण्याचे मोठं काम म्हणजे फार मोठ दिव्य असतं हे पार केलं सुशांत बनसोडे, कपिल धनवडे,संतोष पाटोले,पुष्पेंद्र कांबळे आणि रियाज शेख यांना अनमोल साथ दिली खालील बालमित्रांनी यामध्ये, संदिप सणगर-संतोष सूर्यवंशी-विनायक गोसावीसागर पाटील-सलीम मुलाणी -राणी सोनवणे -रोहित रसाळ -दिपाली साठे-पद्मिनी अवघडे -दशरथ देसाई -प्रदीप पाटील- प्रकाश दोरकर-महेश खटावकर-धुळेश्वर पाटील-जावेद बागवान अरूण सपकाळ-मोहसीन पटाईत-अजित पाटील-संतोष पाटोळे-गजानन सूर्यवंशी-अमोल पन्हाळकर -जास्मिन बागवान -रामचंद्र सूर्यवंशी -अक्षय पाटील-प्रमोद पाटील नितीन कमलाकर-प्रियांका भंडारे  सुयोग पाटील-रहिम मोमीन- दशरथ सासणे- Arjun Jadhav-अनिल माने- sunil mane-वर्षाराणी ताटे-संदीप पोवार -साईनाथ लोले-रोहित बुरुड- संतोष पुरोहित- सुनिल मोरे- सुनील कुंभार डॉ आप्पासाहेब सांगरूळे-अर्चना खुलपे-नरेंद्र सणगर-Fatima shikalgar-सचिन कुंभार- Anita Patil हे सहभागी झाले होते

असा रंगला बालमित्राचा मेळावा

pethwadgaon melava
SSC get together

फनी गेम– यामध्ये वेगवेगळे फनी गेम घेण्यात आले पुन्हा लहान होवुन खेळ खेळण्यात जी मजा असते ती कशात नसते ती मजा या खेळामुळे आली या मध्ये फुगे फोडणे असे कार्यक्रम घेतले.

ॲक्शन पास करणे– एक केलेली ॲकशन शेवटच्या पर्यंत पेाहोच करणे आणि त्यांचा परिणाम पहाणे गमतीशीर खेळ.

केसात पाईप ओवणे– मुलींसाठी म्हणजे आता महिला असलेल्या- यांनी पाईप घ्यायचा आणि केसात किती लवकर ओवतो हे पाहणे खरे गमती शीर होते.

हात न लावता बिस्किट खाणे– आपणास कोणते खाण्याचे पदार्थ दिसले की लगेच खातो परंतू हात न लावता बिस्किीट खाणे हे आपल्यासाठी खुप मोठे अवाहन असते तू पूर्ण करताना खुपच आनंद सर्वांनाघेतला.

प्रश्नाचे उत्त्त तसेच आईचं पत्र हरवलं जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपले सर/मॅडम असे खेळ घेत असे आणि आपण आनंदाने हे पत्र शोधत आणि खेळ खेळत. त्यामुळे पुन्हा बालपणाचे आठवण झाली.

असे खेळ घेतल्याने मनाला मोठे आनंद झाला आणि बालमनाच्या खटयाळ,निरपेक्ष भावना निर्माण झाल्या. 

मेळाव्याच्या खर्चाच्या रक्कमेतुन सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..  कार्यक्रमास पुन्हा भूतकाळतल्या शाळेच्या जून्या आठवणी ताज्या झाल्या. तिथे एक गोष्ट जाणवली ती अशी की जूने पण दुरावलेले स्नेही… पुन्हा एकत्र आणण्याचा संकल्प सर्व माजी विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष करुन दाखवला…मग काय २० वर्षातले माजी विद्यार्थी पुन्हा शाळेत दाखल झाली. आभासी मैत्रीत आता अशा मेळाव्याची खरी गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवले…पुन्हा एकत्र भेटल्यावर अनेकांच्या चेहर्यावर कमालीचा आनंद दिसत  होता. एकीकडे आज फेसबुकवर नवे मित्र दररोज भेटतात….पण दुसरीकडे आपलं बालपण ज्यासोबत घालवलं त्यांना मात्र आपण विसरत चाललोय…आभासी मैत्रीत आता अशा मेळाव्याची खरी गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवले असे मत माजी विद्यार्थी प्रकाश दोरकर यांनी वेक्त केले शाळेकडून मा. श्री.एच .एम. मेथे सरश्री.  बी .आर. पाटील सर श्री. डि.बी.जाधव सर श्री. डि .एस .नाईक सर  श्री. पी .आर. भोरे सर श्री. एस बी  भोसले सर

श्री.पी.बी.पाटील सर  व कर्मचारी श्री प्रकाश घोरपडे व अरुण नायकवडी यांनी  दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रामची प्रस्तावना माजी विद्यार्थी श्री प्रदीप पाटील यांनी केली व ————यांनी आभार मानले.

यामध्ये प्रत्येकजण आपल्याच तालात आणि आनंदाने बेभान होईन नृत्य करत होते, कोणी एकमेकासोबत गप्पा मारत होते तर कोणी जुन्या आठवणीतले जोक्स करुन मनमुराद आनंद घेत होते, हसत होते, तर कोणी स्वताबददल एकमेकांना माहिती देत होते. तर कोणी सेल्फी घेण्यात दंग होते तर कोणी स्वताच्या कॅमेऱ्यात हे आनंद क्षण टिपत होते तर कोणी या सर्व बाबीचा दिलखुलाश आनंद घेत होते. हा आनंद घेत असताना आज काही सोबती पाखरे आपल्यातून निघून गेले होते त्या सर्वांच  एकत्र फोटो लावून मनातून भावपूर्ण श्रध्दांजली वाहत होते. याला म्हणतात कृतज्ञता. याला म्हणतात मित्र…यालाच म्हणतात मनाचा मोठेपणा आणि सहवासात घालवलेल्या आठवणीचा आदर..

सर्वांनी मिळून मिसळून मस्त पैकी मिष्ठान्ना भोजना आस्वाद घेतला आणि मग आठवणीचा जणू  मैफिल रंगली………या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वांनाच आज घरी जाण्याची अजिबात घाई नव्हती कारण आज पुन्हा एकदा पूर्ण आयुष्या रिचार्ज झाले सारखे वाटत होते आणि पुन्हा पुन्हा असेच दिवस जगावे,पुन्हा पुन्हा एकत्र यावे असे वाटायला लागले. परंतू प्रत्येक क्षण हा जाण्यासाठी असतो परंतू तो क्षण हदयात साठवून ठेवण्यासाठी असतो. जाताना मात्र निरोपाचा नियम पाळवा लागतो.

आयुष्य हे खुप सुंदर आहे अशा निवडक प्रतिक्रिया……

 

कार्यक्रम खुप छान झाला.वीस वर्षा नंतर सगळे एकत्र जमलो, एक उनाड दिवस जगु शकलो. जबाबदारी – बंधन ,संसार कशाचेही त्या दिवशी भान नव्हते. आपल्या मित्रांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्वांना एक भव्य  व्यासपीठ उपलब्ध करुन दिले, सर्वांनी आपल मन मोकळ केल. मला वाटत दरवर्षी असा सर्वांनी कार्यक्रम केला तर डीप्रेशन मधे जायच प्रमाण नाहीस होईल बाकी उत्कृष्ट नियोजन, पारदर्शी व्यवस्थापन आणी सर्वांनी दिलेला प्रतीसाद उल्लेखनीय होता.

वर्षाराणी ताटे

एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खो-खो कबड्डी चे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेल्या त्या गोड आठवणी… आयुष्य बदलत असते वर्गातून आँफीस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फाँर्मल पर्यंत पाँकेटमनी पासून पगारापर्यंत प्रेयसी पासून पत्नी पर्यंत पण मित्र ते तसेच राहतात…

 अंकुश डोईफोडे

शाळेचे दिवस आज मन पून्हा त्या शाळेत जाऊन आलं सूनं सूनं एक एक क्लास मन गहिवरून आलं…ते दिवस जगायला आता कुठं मिळतील जगलेले दिवस मात्र आठवणीतच राहतील…कसे बोलू? काय बोलू?सुचत नाही मलाकसा दिवस आजचा निघून गेला कळलाच नाही मलाआठवतो तो पहिला दिवस रडत आलोआठवेल आही दिवस रडतच चाललोशाळा म्हणजे काय असते?आज कळले मलाइथून दूर जाताना

सगळं आठवले मला

कपील धनवडे

काय बोलू मित्रांनो शब्दच नाहीत बोलण्यासाठी 2004 जेव्हा दहावी पास होउन बाहेर पडलो ते थेट 2024 मध्ये भेटलो ,भेटलो ते भेटलो तेही आपल्या जुन्या शाळेत जुन्या वर्गात जेव्हा मी वर्गात पहिले पाऊल टाकले पूर्ण आयुष्य फ्लॅशबॅक मध्ये गेले. कायम आमचाबसण्याचा ब्यांच मुलींच्या पाठीमागे बसायचं आणि तिथेच जाऊन बसलो खरंच खूप सुंदर क्षण होता तो बाहेर आल्यावर पुष्पाने वाजवलेली बेल तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा सुखद अनुभव स्मित हास्य आणि काहींच्या डोळ्यात आलेले पाणी, माझ्याही डोळ्यात आले होते ते सरांचे लेक्चर पाठीमागे दंगा खूप मिस केले.Miss u मित्रांनो खास करून  आभार मानतो सुशांत, कपिल,पुष्प्या,  यांच्यामुळे तो क्षण अविस्मरणीय झाला Love you guys🙏🏽🙏🏽 सदैव आपला जिवलग मित्र प्रकाश दोरकर

मैत्री म्हणजे मनाचं कोड सोडवणारी आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारी.  तुमच्या माझ्या मैत्रीबद्दल काय काय बोलावं पावसाच्या सरी येऊन गेल्यावर इंद्रधनुष्य पडावं रोज रोज बोलण्याची अपेक्षा न करणारी पण कठीण प्रसंगी मात्र धावून येणारी चुकीच्या मार्गावरून दूर जाणारी एक विलक्षण सोबत म्हणजे मैत्री,  संकटाशी झुंजणारा वारा मैत्री म्हणजे विश्वासाने वाहणारा झरा मैत्री म्हणजे स्वप्न नसते विसरायला मैत्री म्हणजे पुस्तक नसते संपायला. अरे मैत्री तर कारण असते आयुष्य जगायला लहानपणी केली खूप मारामारी आता आहे दिल दोस्ती दुनियादारी .मित्राच्या लग्नात त्याच्या अगोदर यांची तयारी ?(हरवली हरवली पाखरे)✍ ♥🤝👬👫👭.    Padmini Avaghade Bhadole पदमिनी अवघडे-भादोले.

नमस्कार मित्रांनो माझ्या मनातील दोन शब्द मी मांडत आहे गेटुगेदरच्या कार्यक्रमानंतर मला इतकं भारी वाटलं की मित्रांनो सांगताना मला शब्द नाहीत 2004 नंतर शाळेतून बाहेर पडलो त्यानंतर नंतर एकदा पाठीमागे फिरून बघेन असं मनातही नव्हतं पण गेट-टुगेदर चा कार्यक्रम अरेंज केल्यानंतर पुन्हा एकदा मागे वळून बघितलं तर तेव्हा माझे मित्र मैत्रिणी आम्ही सर्वांनी जो खेळ खेळायचो परत ना आपल्या मित्रांबरोबर धमाल करायचं त्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा आठवल्या आज असं वाटतंय की शाळेत होतो तेव्हा वाटायचं कधी एकदा शाळेतून बाहेर पडतो पण आज असं वाटतंय मनाला की शाळेतून बाहेर उगाचच पडलो का तर ती धमाल ती मस्ती ती आणि शिक्षकाने केलेल्या मार्गदर्शन चुकले तर पनिशमेंट केलेली ते सर्व आठवलं आणि डोळ्यातून पाणी आलं की आज आपण ह्या जगाच्या दुनियेत हरवलो आहे पण पुन्हा एकदा हे अनुभवायला मिळालं गेट-टुगेदर चा कार्यक्रम 21 तारखेला घेतला पुष्पेन्द्र कपिल धनवडे सुशांत बनसोडे संतोष पाटोळे यांच्या नियोजनामुळे आज हा अनुभव मिळाला आणि असं वाटलं की खरंच शाळेत होतो तेव्हा खूप मज्जा याची काही झालं तर मित्र म्हणायचे अरे मी आहे की मित्रा मग कसली अडचणी येऊ दे मित्राने खांद्यावर टाकला की एकदम भारी वाटायचं  दंगा करायचा मस्ती करायचे पुन्हा एकदा त्या अनुभव घेता आला खरंच खूप भारी वाटलं ती एक दिवसाची शाळा असं वाटलं की 2004 ह्या बॅचमध्ये पुन्हा एकदा जाऊन ती धमाल ती मस्ती तो दंगा माझ्या मित्र व मैत्रिणी सोबत केला खूप भारी वाटलं खरंच मी सर्वांचा खूप आभारी आहे असंच मित्रांनो साथ देत राहा नेहमी एकमेकांच्या पाठीशी राहू🙏🙏 अजित पाटील

Scroll to Top