केंद्रप्रमुख परीक्षा हॉलतिकिट जाहीर; असे करा डाऊनलोड

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची हॉलतिकिटे (प्रवेशपत्र) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली असून, उमेदवारांना ती आता डाऊनलोड करता येणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षेच्या तारखेकडे आणि हॉलतिकिटांकडे शिक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर प्रशासनाकडून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लिंक सक्रिय करण्यात आली आहे.

हॉलतिकिट कसे डाऊनलोड करावे?

१. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE Pune) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. २. ‘केंद्रप्रमुख परीक्षा २०२३-२४’ या लिंकवर क्लिक करा. ३. आपला Registration Number आणि Password (DOB) प्रविष्ट करा. ४. ‘Login’ केल्यानंतर तुमचे हॉलतिकिट स्क्रीनवर दिसेल. ५. हॉलतिकिटाची प्रिंट काढून त्यावर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • ओळखपत्र: परीक्षेस जाताना हॉलतिकिटासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यांपैकी एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
  • वेळेचे नियोजन: हॉलतिकिटावर दिलेल्या रिपोर्टिंग टाइमनुसारच परीक्षा केंद्रावर पोहोचावे.
  • तांत्रिक अडचण: हॉलतिकिट डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचण आल्यास परिषदेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या परीक्षेमुळे राज्यातील शाळांना पूर्णवेळ केंद्रप्रमुख मिळणार असून, शैक्षणिक गुणवत्तेत भर पडणार आहे. सर्व परीक्षार्थींना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! “ही माहिती आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा”

Scroll to Top