केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2025 डिसेंबरमध्ये होणार ! उमेदवारांमध्ये उत्सुकता!

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCEPune) होणारी केंद्रप्रमुख (Kendraprmukh) पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (Limited Departmental Competitive Examination) डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित होण्याची शक्यता शिक्षण वर्तुळात वर्तवली जात आहे. तथापि, परिषदेकडून यासंदर्भात अधिकृत तारीख किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केंद्रप्रमुखांची मोठी पदे रिक्त आहेत २४१० या रिक्त पदांमुळे प्रशासकीय आणि शैक्षणिक कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी पात्र उमेदवारांकडून सातत्याने केली जात आहे.

मागील प्रक्रियेचा संदर्भ: मागील वर्षी, अर्ज प्रक्रिया काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे पुन्हा सुरू करण्यात आली होती आणि त्यावेळी डिसेंबर महिन्यात अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे त्यांचे वेळापत्रक दिले आहे.

उमेदवारांनी काय करावे? ज्या शिक्षकांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत आणि जे नवीन पात्र उमेदवार आहेत, त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mscepune.in) नियमित भेट देत राहावे. परीक्षेच्या तारखा, हॉल तिकीट (Hall Ticket) आणि सुधारित अभ्यासक्रम (Syllabus) यासंबंधीची कोणतीही माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर सर्वप्रथम जाहीर केला आहे

जुने शिक्षकांनाी जर फॉर्म भरले असतील तरच त्यांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहे परंतू त्यात बदल करुन फॉर्म दुरुस्ती करता येणार आहे.

ज्यांना ६ वर्ष सेवापूर्ण केली आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहेत.

आपण त्या जिल्हयात सेवा करत आहात त्या जिल्हयातच फॉर्म भरता येणार आहे.

अधिकृत माहितीसाठी

अभ्यासक्रम

नोंदणी सुचना

या परीक्षेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या प्रशासकीय कामांना गती मिळणार असल्याने, हजारो पात्र शिक्षक या परीक्षेच्या अंतिम घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत

Scroll to Top