भाजप पक्षाचा जाहीरनामा

ईबातमी :- BJP Jahirnama भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्याला आज संकल्प पत्र हे नाव देण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत.

या मध्ये खालील महत्वाच्या मुददांचा विचार करण्यात आला आहे परंतू दरवर्षी भाजप पक्ष नविन घोषणा देवून आपले प्रचारात आपले विकासाचे मुददे मांडत असतात यावेळी लोकांच्या मनात काय चालू आहे हे निवडणूक झाल्यावरच आपणा सा कळणार आहे

  • देशात वंदे भारत ट्रेन धावणार 3
  • विविध पायाभूत सुविधांचा विकास
  • भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणार
  • पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत राहणार
  • महिला सक्षमीकरण
  • 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर
  • पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याचे काम
  • आयुष्मान योजना
  • देशात वंदे भारत ट्रेन धावणार 3

पीएम मोदी म्हणाले, भाजप वंदे भारत ट्रेनचा देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तार करेल. वंदे भारतचे तीन मॉडेल देशात धावतील. यात वंदे भारत स्लीपर, वंदे भारत चेअरकार आणि वंदे भारत मेट्रो यांचा समावेश असेल. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू आहे. ते जवळपास शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतात एक बुलेट ट्रेन, दक्षिण भारतात एक बुलेट ट्रेन आणि पूर्व भारतात एक बुलेट ट्रेन धावता दिसेल. त्यासाठी सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे

  • विविध पायाभूत सुविधांचा विकास

सामाजिक पायाभूत सुविधांसाठी आम्ही नवीन शैक्षणिक संस्था सुरू करत आहोत. भौतिक पायाभूत सुविधांच्या अंतर्गत, आम्ही देशभरातील महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांचे आधुनिकीकरण करत आहोत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत, आम्ही 5G नेटवर्कचा विस्तार करत आहोत. त्याचबरोबर 6G वर देखील काम सुरू आहे. यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहोत.भाजप सामाजिक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा, भौतिक पायाभूत सुविधा या तीन प्रकारच्या पायाभूत सुविधांद्वारे 21 व्या शतकातील भारताचा पाया मजबूत करणार आहे.

  • भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवणार

भारताला फूड प्रोसेसिंग हब बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे. यामुळे मूल्यवृद्धी होईल.

शेतकऱ्याचा नफा वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

  • पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत राहणार

देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. भारताला जागतिक पोषण केंद्र बनवण्यासाठी आम्ही ‘श्री अन्न’ वर खूप भर देणार आहोत भविष्यातही देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ मिळत राहील. ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेतून भाजप ‘राष्ट्रीय सहकार धोरण’ आणणार आहे. यातून आपण क्रांतिकारी दिशेने वाटचाल करणार आहोत.

  • महिला सक्षमीकरण

गेली 10 वर्षे महिलांच्या सन्मानासाठी आणि महिलांसाठी नवीन संधींसाठी समर्पित आहोत. येणारी 5 वर्षे स्त्री शक्तीच्या नव्या सहभागाची असतील.

  • 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर

भारत हा विकसित देश असला तरी आज ही गरीबी हटाव या योजना जोरात काम करतील आणि गरिबी हटवण्यासाठी उपाय योजना करता येतील

  • पाईपद्वारे गॅस पोहोचवण्याचे काम

आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात स्वस्त पाईपचा स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू.

  • आयुष्मान योजना

आभा आज ही योजना जोरात काम करत असून यांचा फायदा प्रत्येक गरीबांना होत आहे त्यामुळे आज ही योजना महत्वाचे कार्य करुन दवाखान्या बिल भरणे व दवाखाना झालेलेा खर्च देण्याचं काम ही योजना करत आहे

Scroll to Top