महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.यांच्या पत्रान्वयेजा.क्र./प्राशिसं/आरटीई-८०१/२०२४/१४६२ सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत. पत्र सर्वांना मिळाले आहे.
संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०. २. शासन निर्णय क्रर्मकः आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१ दिनांक २५/०७/२०१९.वरील शासन निर्णयानुसार वयाचे निकष् दिले आहेत.
उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय खालील प्रमाणे आहे.
अ.क्र | प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय | दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय |
१. | प्ले ग्रुप / नर्सरी | ४ वर्ष ५ महिने ३० दिवस | ३ वर्षे | ४ वर्ष ५ महिने ३० दिवस |
ज्युनियर केजी | १ जुलै २०२० ३१ डिसेंबर २०२१ | ४ वर्षे | ५ वर्ष ५ महिने ३० दिवस | |
सिनियर केजी | १ जुलै २०१९ ३१ डिसेंबर २०२० | ५ वर्षे | ६ वर्ष ५ महिने ३० दिवस | |
इयत्ता १ ली | जुलै २०१८ ३१ डिसेंबर २०१९ | ६ वर्ष | ७ वर्ष ५ महिने ३० दिवस दिवस |
अशा प्रकाराचे पत्र शिक्षण संचालनालय यांच्याकडून दिनांक २२/०२/२०२४ रोजी काढण्यात आले आहे.तसेच मुलांच्या जन्मा तारखेमुळे व नुकसान होवू नये यासाठी हे असे आदेश देण्यात आले आहेत.