हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा. सुखविंदर सिंह साहेब हे सध्या भलतेच चर्चात आहेत.कारण विविधप्रकारचा गुन्हा किंवा कामात हलगर्जीपणा, दुर्लक्ष, कामचुकारपणा किंवा भ्रष्टाचार, गुन्हे केले तर सीआयडी चौकशी लावली जाते.परंतु सध्या मुख्यमंत्री महोदयांना नाष्ट्यासाठी मागवलेले समोसे त्यांच्यापर्यंत पोचलेच नाहीत…ही बाब अतिशय गांभीर्याने घेऊन यात काय नविन गौडबंगाल आहे का असा विचार करून लावली आहे.
लक्कड बाजारातील रेडिसन ब्लू या हाॅटेल मधून समोसे व नाष्टा मागवला होतापरंतू तो मुख्यमंत्री यांच्या यांच्याकडे आलाच नाही मध्येच सुरक्षा रक्षकांना वाटले आपल्याला आणलेत मुख्यमंत्री महोदय कशाला समोसे खातील या विचाराने सुरक्षा रक्षक यांनी मिळालेले 3 पार्सल डब्बे फस्त केले यामुळे वेगळा काही तरी विरोधकांचा प्लाॅन किंवा वेगळे काही असु शकतोका यासाठी डायरेक्ट CID चौकशी लावली आहे..यात सर्व सुरक्षा रक्षक यांनाही कोणती याबाबत माहिती नव्हती…
समोसा अजून कसा आला नाही याच्या काळजीत सीआयडी आणि वरिष्ट अधिकारी पडले. त्यांनी याची चौकशी सुरु केली, तेव्हा यात सहभागी लोकांचे वागणे सीआयडी विरोधी आणि सरकार विरोधी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यावरून विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करताच सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तो नाश्ता मुख्यमंत्र्यांसाठी होता हे फक्त त्या उप निरिक्षकालाच माहिती होते, अशी सारवासारव केली.