X

शाळेत परसबाग उपक्रम SCHOOL GARDEN

शाळेत परसबाग उपक्रम कसा राबवाल!

शाळा आणि परसबाग यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर या उपक्रमात परसबाग हा उपक्रम घेताला होता शासन निर्णयानुसार परसबाग असेल तरच गुण देणार असे कमिटीने सांगितले होत.म्हणून परसबाग याबदल मला २५ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचा अभ्यास करुन मला जे मुददेची आवश्यक बाबी करण्यासाठी मी अभ्यासलेला मुददे आपणासाठी मांडले आहेत.
ते खालील प्रमाणे

परसबागेची व्याख्या-
शालेय परसबागः शाळेच्या लगच्या मोकळ्या आवारात पौष्टिक भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती इ. यांची लागवड करुन तयार केलेल्या बागेस शालेय परसबाग असे संबोधतात.

भाजीपाल्यांची नांवे

परबाग म्हणून काम करण्याअगोरदर काय करावे
१. जागेचा आराखडा तयार करणे
२. जागा नसेल तर कोणता भाजीपाला किंवा वनस्पती लावण्याचे पूर्व तयारी करावी लागेल.
३. औषधी वनस्पतीची यादी व रोपन करणे
४. जागेची निवड
५. पाण्याचे व्यवस्थापन
६.भाजीपाला संवर्धन नियोजन
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक
मर्यादित जागेचा वापर शाळेमध्ये परसबागेची निर्मिती कुठेही केली जावू शकते. परसबागेसाठी मोकळ्या जागेचा मोठ्या भूखंडाची आवश्यकता नाही, आरोग्यदायी भाज्यांची लागवड कुंडी, कंटेनर यामध्येही करता येते. तसेच, सदर लागवड शाळेच्या गच्चीवर, छतावर किंवा शाळेच्या प्रवेशद्वारावरही करता येते. वेलवर्गीय वाणांची लागवड कुंडीत केल्यास सदर वेल BHINतीवर रेंगाळतात आणि त्यांना जमिनीची गरज नसते. मर्यादित जागेचा महत्तम वापर कसा करता येतो ही बाब परसबाग निर्मितीमधून विद्यार्थ्यांना शिकवली जावू शकते.

  1. परसबाग निर्मिती उदिष्टेः शालेय परसबागेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. ताज्या पिकवलेल्या भाज्यांच्या सेवनाने कुपोषण आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यात मदत करणे.
  2. मुलांना निसर्ग आणि बागकामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे.
  3. भाज्यांच्या पौष्टिक पैलूंबद्दल आणि जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल मुलांचे ज्ञान वाढवणे.
    प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तींची समिती शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२३ अन्वये गठीत करण्यात आली होती. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (सराऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्य आहार देण्याचा निर्णय दि.११ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये मोड आलेल्या कडधान्य (स्प्राऊट्रस) या पाककृतीमध्ये परसबागेतील उत्पादित कांदा, टोमॅटो, कोबी, लिंबू इ. बाबींचा समावेश करणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यासाठी तसेच परसबागेचे महत्व
  4. अधोरेखित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
    शालेय परसबागेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:-
  5. शिक्षण परसबाग निर्मिती व विकास हे व्यावहारिक व थेट शिक्षणाचे एक चांगले उदाहरण आहे. जेथे विद्यार्थी पौष्टीक अन्न कसे उत्पादित करायचे हे शिकतात. तसेच, परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळाच्या सेवनामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही तर उत्पादित भाजीपाल्यामुळे माणसास उपजिविकेची संधी मिळून तो आत्मिनिर्भर बनतो, हे जीवनातील व्यावहारिक बाजूचे शिक्षण मुलांना मिळते, शेती व फलोत्पादनातील व्यावहारिक कौशल्याव्यतिरिक्त परसबागा या पर्यावरणावियक समस्या व जीवन विज्ञानाच्या अभ्यासासाठी एक सजीव प्रयोगशाळा आहे.
  6. आरोग्य परसबाग निर्मिती मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी फायदेशीर आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शारिरीक, बौध्दिक व मानसिक क्षमतांवाढीसाठी मुलांना चांगला आहार आवश्यक आहे. परसबागेमध्ये पिकवण्यात येणाऱ्या भाजीपाला व फळांमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. सदर भाजीपाल्याचा मुलांच्या आहारातील समावेशनामुळे आहारात पौष्टिक मूल्यांची वाढ होते.
  7. पर्यावरणः परसबाग निर्मितीमुळे पर्यावरण सुधारते. शाळेच्या मैदान हे नैसर्गिक वातावरण, तयार केलेले कृत्रिम वातावरण आणि सामाजिक वातावरण या तीन घटकामध्ये विभागले जाते, माती, झाडे, कीटक आणि वन्यजीव, सूर्य प्रकाश आणि सावली, पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुविधा, मार्ग, कुंपण, इमारती आणि अभ्यासासाठीठिकाणे या बाबी सामाजिक जीवन आणि बाह्य जगाशी संपर्कासाठी मुलांना उपयुक्त ठरतात.
  8. नैसर्गिक स्वास्थ savrdhan सेंद्रिय बागकामामुळे मातीचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाशी एकरूप होऊन काम केले जाते. परसबाग निर्मिती ही अन्न पिकवण्याची एक पद्धत आहे. जमीन, सूर्य, हवा, पाऊस, वनस्पती, प्राणी आणि लोक पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. सेंद्रिय बागेमुळे माती सुपीक आणि निरोगी राहते. कीटक आणि रोगांचे नियंत्रण होते. तसेच, सेंद्रिय पद्धती आपले जलस्रोत स्वच्छ आणि रसायनांपासून मुक्त ठेवण्यास मदत करतात.
  9. निसर्गाशी जवळीक:- निसर्गाच्या जवळ असलेली मुले आनंददायी असतात. पुस्तक, शब्द
    किवा पुस्तकातील विविध संकल्पना शिकण्यापलिकडे विद्यार्थ्यांना होणारा आनंद हा पर्यावरणीय शिक्षणाला दिशा आणि प्रेरणा देतो. सुरुवातीच्या काळात पर्यावरणीय शिक्षण हे आश्चर्य आणि शोधाच्या आनंदावर आधारित असले पाहिजे. परसबाग निर्मितीमुळे सदर बाब साध्य होण्यास मदत होते.
  10. विद्याथ्यर्थ्यांमधील आत्मविश्वास वाढः परसबागेव्दारे विद्यार्थी त्यांच्या पालकांना आणि समाजाला चांगले पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. परसबाग निर्मिती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमाच्या मयदिपलीकडे पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती शोधण्यासाठी सक्षम करते.
  11. हवामान बदलाचा परिणाम आणि शालेय परसबागांची उपयुक्ताः-
    मानवाच्या विविध वर्तनाचा हवामानावर परिणाम होत असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
  1. औषधी वनस्पती:-. पपईची तुळशी: कोरफड: आले लसुणः 9. शेवगा (मोरिंगा आवळा,अडुळसा,तुळस, आणि आपण जे गावठी औषधउपचार करण्यासाठी वापरतो ते सर्व औषधी वनस्पती करावेत.

खालील बाबी करणे आवश्यक आहेत.
परसबागेत गांडुळखत निर्मिती
फुलपाखरे, लेडीबर्ड्स आणि इतर वैविध्यपूर्ण कीटक किंवा पक्ष्यांना आकर्षित करणारी फुले लावा.
पक्षी स्नानासाठी छोटेसे पाण्याचे डबके तयार करायला लावा.
नियोजनात काम वाटणी आणि मंडळ निवड-पंप अभियंता”, “टूल मॅनेजर”, “सुरक्षा संघ” आणि “कंपोस्ट किंग” यासारख्या प्रभावी शीर्षकांसह वैयक्तिक विद्यार्थी किंवा लहान संघ विशिष्ट तांत्रिक जबाबदाऱ्या पार पाडू शकतील.
उपाय योजनासाठीह सर्जनशीलता शालेय परसबाग कोंबडी, पक्षी, शेळ्या, रानडुक्कर, म्हैस, माकडे इत्यादींपासून वाचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात
अभ्यासक-लेखक-ज्ञानेश्वर विजागत

शासन निर्णयामध्ये अनेक प्रकारचे अनेक फायदे विविध उपयोग आणि माहिती शासन निर्णयात दिली आहे आपण ही या शासन निर्णयाचा अभ्यास करावा

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील प्रमाणे लिंक

ebatami.com: