सदर परीपत्रकाव्दारे मा. कुलगुरू महोदयांच्या आदेशान्वये सर्व संबधीत पीएच.डी. संशोधन केंद्र/मार्गदर्शक/परीक्षार्थी यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठाची पीएच.डी. पेट परीक्षा-२०२४, दिनांक २८/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. सदर पीएच.डी. पेट-२०२४ परीक्षेचे नांदेड, परभणी व लातूर या जिल्हयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले परीक्षा केंद्र वरील संदर्भीय पत्रान्वये विद्यापीठ संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले असून तेच परीक्षा केंद्र कायम ठेवण्यात आलेले आहे.
सबब, ज्या महाविद्यालयामध्ये पीएच.डी. पेट परीक्षा-२०२४ परीक्षेचे परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सदर परीक्षेच्या पुर्व तयारीचे सर्व कामे करून प्रस्तुत विद्यापीठाच्या पीएच.डी. पेट परीक्षा-२०२४ सुरळीत पार पाडणेसाठी सहकार्य करावे, ही विनंती.
डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा
डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा
संबंधित परीक्षाधारकाला त्यांच्या लॉगीनमध्ये हॉलतिकिट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.