MAHATET 2026 Notification जाहीर: वेळापत्रक व ऑनलाईन अर्ज
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापन, परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. ही परीक्षा रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी राज्यभरात पार पडेल MAHATET 2026
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
- ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: २७ मार्च २०२६ ते १६ एप्रिल २०२६.
- प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन उपलब्ध होण्याचा कालावधी: ०९ जून २०२६ ते २१ जून २०२६.
- पेपर १ ची वेळ (इ. १ ली ते ५ वी साठी): रविवार, २१ जून २०२६ सकाळी १०.३० ते दुपारी १.००.
- पेपर २ ची वेळ (इ. ६ वी ते ८ वी साठी): रविवार, २१ जून २०२६ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.००
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम
या परीक्षेसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरावा लागेल; ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सविस्तर माहिती आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
परीक्षा शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीने (बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ.) भरावे लागेल, चलनाद्वारे शुल्क स्वीकारले जाणार नाही.
जे उमेदवार प्राथमिक स्तर (पेपर १) आणि उच्च प्राथमिक स्तर (पेपर २) या दोन्ही परीक्षा देऊ इच्छितात, त्यांनी एकाच अर्जात दोन्ही स्तरांचा विकल्प निवडावा. यामुळे त्यांची बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी होऊ शकेल आणि त्यांना स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता भासणार नाही
गैरप्रकार केलेल्या उमेदवारांना सक्त ताकीद
सन २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकारात ज्या उमेदवारांचा सहभाग होता आणि ज्यांच्यावर कारवाई निश्चित करण्यात आली आहे, अशा उमेदवारांना MAHATET २०२६ चे ऑनलाईन अर्ज भरता येणार नाहीत. बंदी घातलेल्या यादीत नाव असूनही जर कुणी खोटी माहिती देऊन परीक्षेस बसण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी दिला आहे.
अधिक मदतीसाठी उमेदवारांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत ९०२८४७२६८१ / ८२ / ८३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल
Your Attractive Heading