X

देवबाग बीच परिवारासोबत अविस्मरणीय टुर

!अचनाक ठरलेली पण उत्तम नियोजन असलेली अविस्मरणीय परिवारीक टुर………..
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात अतिशय व्यस्त असतानाच अचानक आमचे मित्र व शेजारी असलेले दिलदार व्यक्ती विजय राऊत सर यांचा फोन आला सर आपणास फिरायला जायचं आहे तयार आहात का? मी कोणाताच विचार न करता लगेच हो म्हणालो विजय राऊत सरांचा पुन्हा फोन आला सर आपणास परिवारासोबत जायचे आहे तुम्ही तयार आहात का?
मी पुन्हा विचारात पडलो आणि सरांना सांगितलं की ठिक आहे मी आईशी चर्चा करतो. अन फोन कट केला. आणि माझे मार्गदर्शक केंद्रप्रमुख श्री मारुती काळूंगे साहेब यांच्या सोबत शाळा भेट नियोजन ठरले ते यमी करत होतो सकाळी ८ ते रात्री ८ पर्यत आमची कामे चालू होती त्यातच शाळेचे जे नव्हते ते ही रेकॉर्ड बनवण्याचे काम चालू होतं त्यात पुन्हा वर्ग अध्यापन आणि मित्रांचे फोन कोणते रेकॉर्ड कसे बनवावे असे अनेक कामे करत व्यस्त असताना डोक्यात कोणताही विचार येत नव्हता आणि त्यात शनिवार असून देखील कामे संध्याकाळी ८ पर्यत चालत असे. इतके व्यस्त असून ट्रिपला जायचे आहे हे ही मी विसरुन गेलो होतो. सर्व कामे आणि माझ्या शाळेचे मुल्यांकन झाले होते थोडा रिलॅक्स आणि मी थोडा नरवस ही होतो….तेवढयात राऊत सरांचा फोन आला की सर मी रुम बुक केलेत आणि पेमेंट ही पे केले आहे. आत्ता यावे लागते.
अचानक पणे राऊत सरांचे पूर्व नियोजन खुपच उत्कृष्ट होतं , त्यांनीच २० सिटर बुक केली आणि ठरवली त्यात माझी पत्नी हयांना ही गोष्ट माहित नव्हती की कोठं फिरायला जायचं आणि केव्हा जायचं उदया जायचं ठरलं आणि मग त्यांची तयारी सुरु झाली त्यांच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण-भोसले यांनाही थोडं आश्चर्य वाटलं मॅडम कोणतीच पूर्व माहिती न देता अचानक रजेवर जात आहेत थोडं त्यांना ही नविन होतं प्राचार्या डॉ.चव्हाण मॅडमने लगेच परवानगी दिली आणि मॅडम लगेच दुपारुन शाळेतून आल्या आणि बॅग भरुन साधारण दुपारी १ वाजता तयार झाल्या. अशा प्रकारे माझी पत्नी आणि मी ही अचानक टुरवर जाण्यासाठी तयार झालो. माझा आधारस्तंभ आणि प्रेरणा म्हणजे माझी आई.वय वर्ष ६७ वर्ष.आईला तसं नवल नव्हतं कारण आम्ही नेहमी या पूर्वी फिरत असे कारण खुपच दिवस झालं होते आम्ही फिरायला गेलो नव्हतो परंतू कोरोना पासून आमची परिवाराची टूर जाणं बंद झाली होती. या पूर्वी आम्ही दाभोळ टुर केली होती तेही महाराष्ट्र शासनाच्या बसनेच…परंतु यावेळी विजय राऊत सरांनी खुपच जबरदस्त नियोजन केलं होतं २० सिटर ट्रव्हल्सने जाणार होतो.तसं विजय सरांचं नियोजन भारीच असतं म्हणून जास्त प्रश्न न करता आम्ही म्हणजेच लेखक दाजी राऊत सर परिवार, उपक्रमशील शिक्षक मधुकर पवार सर परिवार,विजय राऊत सर आणि विजागत परिवार अशी आमच्‌या ४ परिवारांचे १ परिवार करुन आम्ही टुर वर निघालो.

मला कोणताच रुट आणि नियोजन माहित नव्हतं आम्ही सर्वजण गाडीत बसलो आणि गाडी कोल्हापूरच्या हायवे ने जोरात धावायला लागली..धावता धावता गाडीत सेल्फी फोटो सेशन आणि गाणे ऐकत संगीताच्या तालावर संध्याकाळी ६ वा कोल्हापूर येथे पोहोचलो. जवळच असणारे सर्वांचे बाळू मामा यांचे आदमापूर येथे गेलो तर बाळू मामाचे मंदिरातील दर्शन बंद आहे असं कळलं आमचा हिरमोड झाल्यासारखं
झालं मंदिरातील एका भक्ताला विचारलं की बाळूमामाचं दर्शन हवे आहे त्यात त्यांनी सांगितलं की अहो आता ७ वा मामाची आरती आहे आणि लगेच आरती सुरु झाली आम्ही आरती केली आणि बाळू मामाचं दर्शन करुन पुन्हा गाडीत बसून पुढचा प्रवास सुरु केला
गाडी हायवे ने पळत होती आणि आम्ही देवबागच्या दिशेने जात होतो. खुपच उशिर झाला होता रात्री १० वा एका हॉटेलवर सोबत घेवून गेलेलो भाकरी चटणी सोडल्या आणि जेवायला बसलो.
जेवण झाले आणि अंधारातच फोंडाघाट पार केला फोंडा घाट ३५ किलोमीटर चा हे अंतर पार केल्यानंतर आम्ही रात्री १२.३० वा पोहोचलो आणि निसर्गाच्या कुशीत आणि समुद्राच्या अगदी काठावर १०० मीटर पाण्याच्या लाटाजवळच्या रुम्स पाहून खुपच आनंद झाला.
देवबाग बीच हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. त्याला “महाराष्ट्राचे मॉरिशस” असेही म्हणतात. तेथील किनारा, निळे पाणी, नारळाची झाडे आणि मऊ वाळूसाठी प्रसिद्ध आहे. देवबाग हा एक शांत आणि निसर्गमय समुद्रकिनारा असल्याने अनेक पर्यटकांना आकर्षित करतो हे तेथे पोहोचल्यावरच कळले.
थंडगार वाऱ्याची झुळूक आणि समुद्राच्या निरंतर लाटा आणि लांटाचा आवाज हे सगळं पाहून मनाला खुपच छान वाटलं….. पुन्हा रात्री १ वाजता शांत असलेल्या समुद्राच्या लाटा आणि किनाऱ्यावरुन एक फेर फटका मारला आणि एवढा ३५० किमीचा ८ तासाचा प्रवास नाहीसा झाला. वातानुकूलित खोल्या आणि जबरदस्त खोल्याची बांधणी यामुळे मस्त अशी झोप लागली आणि सकाळी ६ ला जाग आली.
सकाळी लवकर उठून समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद लुटला सर्वाानी उडया मारल्या,पाण्यात कोणी झोपलं होतं तर कोणी पळत होतं कोणी फोटो घेत होते मस्त भिजून आणि पुन्हा रुम मध्यू जावून न्हाहून झाल्यावर आम्ही नाष्टा केला. घावण नावाचा तांदूळापासून बनवलेला पदार्थ घेतला सोबत चटणी व उपमा घेतला. लगेच पुढे कोठे जायचे हे नियोजन ठरले होते हॉटेल मॅनेजरने पाण्यातील खेळ म्हणजेच देवबाग येथे जेट स्कीइंग, parasailing, banana boating आणि स्कूबा डायव्हिंगसारखे पाण्यातील खेळांचा आनंद घेता येतो. ते करण्यासाठी एक यासाठी एका एजंटला बोलावले आणि लगेच एका बेटावर साधारण अर्धा किलो मीटर चालत गेल्यावर एका बोटीत सर्वजण बसलो बोटीने आम्हाला तेथील पाण्यातील खेळ जेथे चालतात त्या ठिकाणी आम्हाला सोडले बेटावर जावून वरील खेळाचा सर्वााना भरपूर आनंद घेतला निळसर आणि स्वच्छ सुंदर पाण्यात खुपच मजा केली.
पुन्हा समुद्राच्या आत म्हणजे प्यारा सेलिंगसाठी डिप समुद्रात जाण्यासाठी दुसऱ्या बोटीत शिप्ट केले आणि आम्ही अथांग समुद्राच्या लाटांचा अनुभव घेत समुद्राच्या काठापासून समुद्रात बोटीने आम्हाला घेवून गेले पक्ष्यासारखं समुद्राच्या वर आकाशात प्यारासेलिंगने झेप घेतली आणि निळासर आणि अथांग समुद्र,नाराळांची झाडे थंडगार हवा लागायला लागली ….क्षणात पक्ष्यासारखं आपण आज समुद्रावर सफर करायला लागलो आहे किती मस्त ! सर्व कंटाळा दुर करणारा अनुभवला मन प्रसन्न झालं खुपच आनंद झाला सोबत माझी मुलगी होती आकाशात वर गेल्यावर मी वेगवेगळे सिन दाखवायला लागलो ती तर आनंदाने नाचायला लागली आणि किती मस्त मस्त करायला लागली. प्रत्येक क्षणांचा आनंद घेत राहिली. पुन्हा साधारण ४ मिनिटाने आम्हाला खाली आणले मला खुपच आनंद झाला आयुष्यात कधी ही न घेतलेला आनंद आम्ही घेतला होता. मनाला आनंद देणारा, नवचेतना देणारा, निखळ आनंद वाटणारा सर्वांना हवाहवा असणारे अनुभव या प्यारा सेलिंगने आम्हाला मिळाला होता. अगदी ताजेतवाणे वाटायला लागले होते मनातील विचार आणि सर्व ताण क्षणात दुर झाले होते मस्त असा गारवा आणि लाटा हे सगळे मनाला भुरळ घालणारे होत. हे सगळे नवीन होत आमच्या साठी दुपारी ३ वाजले तरी अजून जेवण केले नव्हते याचा सुध्दा विसर पडला होता. पुन्हा आम्ही रुमवर परत आल्यावर आराम केला जेवण केले आणि स्कूबा करण्यासाठी तयार झालो परंतू समुद्र खवळला होता त्यामुळे देवबाग येथील स्कुबा बंद झाले आणि आमचा हिरमोड झाल्यासारखे वाटले परंतू थोडा वेळा आराम करुन आम्ही पुन्हा देवबाग किनाऱ्यावर जावून बसलो आणि समुद्राचा शांत पणा अथांगपणा पाहात व आनंद घेत बसलो संध्याकाळी हॉटेल मध्ये जेवण केले सुरमई थाळीचा अस्वाद सर्वांनी घेतला मी शकाहारी असल्याने मला वेज थाळीवरच समाधान मानावे लागले रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो रात्रीचे ही तेथेच २ दिवसाचे बंकिंग असल्याने मुक्काम केला आणि सकाळी सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासती निघालो होतो तेथे ही 45 प्रवासी झाल्याशिवाय किल्यात घेऊन जात नाहीत हे कालेले तो पर्यन्त वडापाव मिसळ ताव मारला होता ४५ सीट झाल्यावर बोट मध्ये बसून किल्ला पाहायला गेलो आम्ही सिंधुदुर्ग पाण्यातील मालवण किल्ला, पाहिला पाण्यातील भक्कम तटबंधी असलेला किल्ला, समुद्राच्या ४ ही बाजूनी व्यापलेला किल्ला, मस्त किल्याची माहिती घेत संपूर्ण किल्ला पाहिला. पुनः बोटणे काठावर आलो पुनः परत बोटीने समुद्रात निघालो
समुद्र प्रत्यक्षात पाहिला ! समुद्राच्या वर जावून कसा दिसतो निसर्ग हे ही पाहिलं ! आता समुद्राच्या आत काय काय असतं ? हे पाहण्यासाठी आम्ही म्हणजेच स्कुबा डाईव करण्यासाठी समुद्राच्या खोल पाण्यात दुसऱ्या बोटीत बसून गेलो. ३ तास स्कुबा करण्यासाठी गेले. खरं तर समुद्रात मी पोहोललो होतो परंतू समुद्राच्या कधी खोल पाण्यात जाण्याचं कधी धाडस गेलं नव्हतं. परंतू त्या दिवशी समुद्राच्या खाली जाण्यासाठी ऑक्सीजन सिलेंडर लावून आणि बारीबरी ने पाण्यात उतरलो होतो. सोबत स्कूबा करणारे ही मदतीसाठी होते.नितळ आणि स्वच्‍छ पाण्यात मोठे,छोटे,रंगबेरंगी मासे आणि समुद्र शैवाळ पाहायला मिळत होते तो ही अनुभव खुपच छान होता. समुद्राची तळाशी काय असते आणि उसुकता होती की खरंच आपण ही पाण्यात ५ मिनिट पाण्याखाली बसू शकतो याचा अनुभव आला

त्यांनतर आम्ही रॉक गार्डन पाहून परतीच्या मार्गवर निघालो होतो.
आयुष्यात फिरलं पाहिजे तेही परिवारासोबत कारण रोज रोज तेच करुन कंटाळा येतो मनाला कोठेतरी आनंदी वाटण्यासाठी रोज रोज त्याच कामातील बदलासाठी आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी एकदा तरी देवबागला आवश्य भेट दिली पाहिजे किमान १ दिवस तरी नारळाच्या झावळयात आणि समुद्राच्ष्या सानिध्यात वास्तव करुन निसर्ग आणि शुध्द हवा घेतली पाहिजे यांचा अनुभव आला.डॉल्फिन्स आणि इतर समुद्री प्राणी पाहण्यासाठी बोट राइड करायचा राहून गेलं…..तरी पण आम्हाला देवबागच्या काठावर त्याच दिवशी एका डॉल्फीनचे दर्शन सकाळ सकाळ झाले त्यामुळे खुपच मस्त वाटलं.
खर्च तर होतच असतो पण त्याच बरोबर आयुष्यातील निसर्गाचा आस्वाद आणि आनंद ही मिळलाच पाहिजे त्यासाठी २ दिवस थांबण्यासाठी हे ठिकाण खुपच छान आहे. निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घ्या आणि सुंदर फोटो काढा स्वादिष्ट कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खुपच मस्त असे ठिकाण आहे. रूम्स ऑनलाइन बूक करता येतात नाही केले तर जास्त अडवून पैसे घेतात त्यामुळे आपणास तेथे राहायचे असेल तर ऑनलाइन बूकिंग केले पाहिजे

ebatami.com: