अक्षर सन्मान सोहळा
ऑनलाइन बातमीपत्र-माझी शाळा माझा फळा समूह व ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चौथे अक्षर संमेलन बारामती या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. अक्षरांची गोडी माणसे जोडी असं या अक्षर संमेलनाचं स्लोगन आहे हे अक्षर संमेलन 23 मे ते 25 मे 2025 दरम्यान दिनकर सभागृह शारदानगर, बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी अशा निसर्ग रम्य नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये चौथे राज्यस्तरीय अक्षर संमेलन संपन्न होणार आहे.
संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा विश्वस्त एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामती माननीय सौ सुनंदाताई राजेंद्र पवार व शुभहस्ते श्री. राजेंद्र पवार ,चेअरमन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट शारदानगर बारामती,संमेलनाध्यक्ष तथासह व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ माननीय श्री प्रशांत साजणीकर हे उपस्थित राहणार आहेत याचबरोबर जागतिक दर्जाची सुलेखनकार अच्युत पालव मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शुभम गायकवाड, होप फाउंडेशन नरेंद्र महाडिक ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय रांगोळीकार महादेव गोपाळे माजी स्वागत अध्यक्ष प्रशांत वाघमारे, सतीश उपळावीकर, हेही उपस्थित राहणार आहेत
खालील बाबीवर सादरीकरण/परीसंवाद होणार आहे
यामध्ये पेपर कॅलिग्राफी, पॉट मेकिंग, पिंपळपानाची व्यक्तिचित्र, मराठी स्प्रेगन पेंटिंग, दोन्ही हाताने लेखन ,सुंदर हस्ताक्षर, निसर्ग चित्र, कॅरिकेचर फेस पेंटिंग ,छत्रीवाली पेंटिंग, सूर्यकंकाळ परिसंवाद गालिचा व रांगोळी लेखन साहित्य आणि अक्षर सन्मान दिमागदार सोहळा रंगणार आहे असे अशी माहिती मुख्य संयोजक अमित भोरकडे सुलेखनकार यांनी दिली आहे.
या संमेलनाचा उद्देश ग्रामीण भागातील अक्षरलेखनकार किंवा कलेशी संबंधित असलेले सर्व कलाकारांना एकत्र येऊन आपला व्यवसाय कशा पद्धतीने पुढे नेता येईल व कलेतून अर्थ प्राप्ती कसे होईल किंवा कलेतून आपणाला आनंद कसा घेता येईल या बाबीवर तीन दिवसात चर्चा प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक व विविध बाबींचे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर माननीय अमित भोरकडे सर यांनी माझी शाळा माझा फळा यांच्या माध्यमातून सर्व कलाकारांना एकत्र करून एका माळे मध्ये गुफंण करण्याचे फार मोठा काम केला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षांकडून किंवा कोणाकडूनही देणगी न घेता स्वतः कलाकार स्वतःच्या पैशाने या संमेलनासाठी उपस्थित राहतात. या संमेलनामध्ये अनेक सकारात्मक बाबी समोर येत आहे त्यामुळे सर्वांना सर्व व्यावसायिकांना या अक्षर संमेलनामध्ये सहभागी होता येते. कोणत्याही वयाची अट नाही व व कोणत्याही शिक्षणाचे अट नाही. त्यामुळे सर्व घटकातील सर्व कलाकार यामध्ये अतिशय आनंदाने तीन दिवस गु*या गोविंदाने आपलं सादरीकरण आपली कला सर्व पर्यंत पोहोचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत असतात . तर यावर्षीचे हे संमेलन बारामती या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या संमेलनात उपस्थित राहण्यासाठी आपणाला रजिस्ट्रेशन करणे अत्यंत महत्त्वाचा आहे रजिस्ट्रेशन केलं तरच आपणाला या संमेलनास उपस्थित राहता येईल असे माहिती संमेलन नोंदणी प्रमुख यानी दिली आहे.
या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असलेल्या कलाकारांना कोणत्याही प्रकारची फाईल न घेता अक्षर गौरव पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार अत्यंत मानाचा असतो. कारण महाराष्ट्र मधील सर्व क्षेत्रातील कलाकार या ठिकाणी उपस्थित राहतात हे या अक्षर संमेलनासाठी आपण सर्वांनी 17 तारखेच्या आत आपण या रजिस्टर नोंदणी करावी.
रविवार, दि. २५ मे २०२५
दुपारी ३.०० वा. अक्षर सन्मान सोहळा खालील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्ष -मा.श्री. प्रशांत साजणीकर (सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ)
शुभहस्ते
मा.श्री. रोहितदादा पवार (विधानसभा सदस्य, कर्जत-जामखेड मतदार संघ, महाराष्ट्र राज्य)
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. राजेंद्रदादा पवार (चेअरमन, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती)
मा. सौ. सुनंदाताई पवार (विश्वस्त, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती)
मा.श्री. संजय इंगळे (सहसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)
मा.श्री. कैलास बिलोणीकर (सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)
मा.श्री. व्यंकटेश भट (सहसचिव, गृहविभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)
मा.श्री. चेतन निकम (उपसचिव, गृहविभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)
मा.श्री. संतोष लोणकर (ज्येष्ठ चित्रकार, पुणे)
अक्षर गौरव पुरस्कार २०२५ यादी
(राज्यस्तरीय अक्षर संमेलन २०२५)
- श्री. शरद श्रावण महाजन – ज्येष्ठ व्यंगचित्रकार / सुलेखनकार – एरंडोल, जि. जळगाव
- श्री. महेंद्र वसंतराव वसरोडकर – ज्येष्ठ चित्रकार / सुलेखनकार – वसई, जि. पालघर
- श्री. वनवृत्ती गंगाराम डोके – ज्येष्ठ चित्रकार – संगमनेर, जि. अहमदनगर
- श्री. शीतलकुमार विठ्ठल गोरे – चित्रकार – शेवगाव, जि. अहमदनगर
- श्री. मुकेश देविदास नायक – सुलेखनकार / चित्रकार – गोरेगाव, मुंबई
- श्री. समीर अशोक चांद्रकर – रांगोळीकार – मालवण, जि. सिंधुदुर्ग
- श्री. राजन मधुकर वसरोडकर – रांगोळीकार – मुंबई
- श्री. अक्षय शशिकांत शहापूरकर – रांगोळीकार – पुणे
- श्री. जगदीश कृष्णराव वडंगे – फलकलेखनकार – नाशिक
- श्री. सागर पवार – फलकलेखनकार – नाशिक
- श्री. योगेश वसंत गावीत – फलकलेखनकार – सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
- श्री. रतिलाल ताराचंद सोनवणे – फलकलेखनकार – चोपडा, जि. जळगाव
- श्री. एकनाथ शंकर नाईकवाडी – सुलेखनकार – सिन्नर, जि. नाशिक
- श्री. प्राणजित प्रभाकर बोरसे – सुलेखनकार / रांगोळीकार – कन्नड, जि. छ. संभाजीनगर
- श्री. सदाशिव सातप्पा कांबळे – सुलेखनकार / रांगोळीकार – पिंपरी चिंचवड, जि. पुणे
- श्री. मनोज महादेव हातकेर – सुलेखनकार – कराड, जि. सातारा
- श्री. गुरुप्रसाद गोवर्धन शिंदे – युवा सुलेखनकार – माळशिरस, जि. सोलापूर
- श्री. देवानंद उत्तम रावणचवरे – युवा रांगोळीकार – नांदुरा, जि. बुलढाणा
- श्री.मंगेश महानंदा दिवाकर कांबळे – युवा रांगोळीकार – यवतमाळ
- श्री. महेश अशोक मस्के – युवा चित्रकार – बर्सी, जि. सोलापूर
- सौ. वनशा विश्वास उपाले – रांगोळीकार – बोरिवली, मुंबई
कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.letter