🌹 बालमनाच्या भावविश्वाला समजून घेतल्यासच घडेल उद्याची उज्ज्वल पिढी!प्रा.डाॅ.शिदे के.जी.
सोलापूर, दि. १४ नोव्हेंबर २०२६ : बालपण म्हणजे निरागसतेचा झरा, कुतूहलाचा खजिना आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी! बालकांच्या भावविश्वाला समजून घेत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा संदेश देत सोलापूर येथील दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. पी. आर. भोजे, समन्वयक मा. डॉ. शिंदे के.जे. सर, डॉ. पन्हाळकर एस.एस.सर, डॉ. मिटकरी जी.एम.सर आणि डॉ. नागनाथ येवले प्रा.कांबळे एम.एम. यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बी.एड. प्रशिक्षणार्थी संतोष कांबळे यांनी बालदिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. बालकांच्या जीवनातील बालपणाचे महत्त्व, त्यांच्या भावनिक गरजा आणि भावी शिक्षकांची जबाबदारी याविषयी त्यांनी विचार मांडले.
‘बालदिन साजरा करणे म्हणजे केवळ मुलांना शुभेच्छा देणे नव्हे, तर त्यांच्या मनातील भावना, आवडीनिवडी, जिज्ञासा आणि बालमानसशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे,’ असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रा.डाॅ. शिंदे एस.एस. सर यांनी केले. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्यामुळे बालकांची मानसिकता समजून घेत त्यांना आनंददायी, भीतीमुक्त व विद्यार्थी-केंद्रित शिक्षण देणे ही प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांच्या मार्गदर्शनातून मिळाला.
बालकांच्या निरागस हास्यातच शिक्षणाचे खरे सौंदर्य दडलेले असते. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण देण्याचा विचार या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

बालदिन साजरा करताना मान्यवर…मा.डाॅ.येवले नागनाथ प्रतिमा पूजन करताना
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कालिंदा देशमुख यांनी केले. आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातून त्यांनी कार्यक्रमाची सांगड घातली.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुखदेव विजागत, संतोष मोरे तसेच शिक्षिका सुतार मॅडम ,यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर बी.एड. शैक्षणिक वर्ष २०२६–२०२८ च्या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
बालकांच्या हक्कांची जाणीव, त्यांच्या भावविश्वाचा आदर आणि आनंददायी शिक्षणाची गरज अधोरेखित करणारा हा बालदिन सोहळा भावी शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.
‘बालमन जपा, बालपण फुलवा आणि संस्कारक्षम उद्याची पिढी घडवा!’ हा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
