X

पंढरपूरात तालुक्यात प्रथमच वारी अगोदर पाऊस!

ईबातमी-न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसापासून पावसाची सतंतधार चालू आहे गेले ५ दिवस सलग पाऊस पडत असल्याने पंढरपूरकर एकदम खुश झाले असून बहुतांश बोरवेलचे पाणी वाढल्याचे दिइसून आले आहे. यामुळे सर्व नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावर्षी रोहिणी नक्षत्रात पावसाने चांगली सुरुवात केली असल्याने पंढरपूर येथील प्रसिध्द पदमावती म्हणजे तुळशीवृंदाचनाचा तलाव आज बऱ्यापैकी ८० टक्के भरला आहे.दरवर्षी पंढरपूरला पाऊस हा आषाढी वारी झाल्यावर येत असतो पण यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
यात अनेक शेतातील बांधामध्ये आणि चंद्रभागाची काही अंशी पाणी पातळीत डबके भरुन वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी उन्हाच्या झळा जोरात वाहत होत्या त्यामुळे पाण्याचा मोठी टंचाई निर्माण झाली होती पंरतू या
पावसाने आठवडाभरातच पंढरपूर मध्ये जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे यावर्षी पावसाने १२५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे असे हवामान खात्याकडून माहिती मिळाली आहे
जूनमध्ये पडला १०३ मिमी; अनेक वर्षांनंतर जून महिन्यात प्रथम पावसाने हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.
पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद रविवारपर्यंत झाली आहे. दर वर्षी आषाढी वारी झाली की मोठा पाऊस पडत असतो परंतू यावेळी पावसाने कमाल केली आहे.आषाढी वारीच्या अगोदरच पावसाने सुरुवात केली आहे.
यंदा डाळिंब,द्राक्षे,ऊस पिकांना पाणी मिळाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.तसेच पंढरपूर शहरा लगतच्या कोर्टी,कासेगांव,गादेगांव,गोपाळपूर परिसरात पावसाने चांगले आगमन केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक जाम खुश झाले आहेत.

पाऊसाचं झरनं लहरतं,
प्राकृतीचं संगीत बहरतं,
प्रत्येक संयमांचे ज्ञान देतं,
पृथ्वीवर रंग चढवतं.

पावसाचं नृत्य कल्पनेतं,
थेंबाचं टपकणं,
पानांचं घेतं अलगत चुंबनं ,

धरा स्वीकारतं स्वयंपूर्ण वर्षा,
मेघ शक्ती सोडत आकाशात,
भूमीची तृषा बुजावतं,
आणि जीवनाचं विविध रंग वाढवतं.

झिरकताना, स्वप्न प्रस्थान करतं,
दिवस धूळपाटी सुरू झाल्यावर,
पाऊस, लोकांच्या हृदयात लागतं,
जीवनातलं आशावाद जागवतं.

पाऊस गोडं आणि नित्य बरसणारं,
तो लोकांच्या शांततेत जगतं,
त्याच्या संगीतात त्याच्या आत्मांस छोडणारं।
पावसाचं थेंब झेलतं…Ohal Rujuta

ebatami.com: